पुणे

तळेगावातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला देण्याची मागणी

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १८ : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर- न्हावरे हा राष्ट्रीय महामार्ग तळेगाव ढमढेरे गावातून जात असून, रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना भूसंपादनाची नोटीस न देता रस्त्याचे काम सुरू केले आहे. तळेगाव ढमढेरे व माळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य तो मोबदला द्यावा, तसेच गावच्या हद्दीतून महामार्ग जात असल्याने रस्त्याच्या कडेच्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी तीन मीटरने कमी करावी, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली.
बाधित शेतकऱ्यांना शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळावा, तसेच गावातून तीन मीटरने रस्त्याची रुंदी कमी करावी, यासाठी आपण विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. ढमढेरे यांनी अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर, परिस्थितीची पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले असल्याचे ॲड. ढमढेरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT