पुणे

तळेगावात ३१ डिसेंबरमुळे २००० शेळ्या, मेंढ्यांची विक्री

CD

तळेगाव ढमढेरे, ता.३०: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सुमारे २००० च्या वर शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्री झाली असल्याची माहिती प्रशासक हरिश्चंद्र कांबळे, सचिव अनिल ढोकले व सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी दिली.
आठवडा बाजारात सोमवारी (ता.२९) झालेल्या ३१ डिसेंबरमुळे मोठ्या प्रमाणात शेळी, बोकड व मेंढ्यांना मागणी होती. परिणामी बाजारात पुरवठा ही तेवढ्याच प्रमाणात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री झाली. सोमवारी झालेल्या बाजारात शेळी व बोकडाला सुमारे ८००० हजार ते २१००० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. मेंढीला ४००० हजार ते ९००० हजार रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला. शेळी - मेंढी बाजारात विक्री मोठ्या प्रमाणात होऊन आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
बाजारात अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सातारा, बीड आदि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेळी - मेंढी विक्रीसाठी आणली होती. तसेच अहिल्यानगर, सातारा, अलिबाग, मुंबई, पनवेल, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे व्यापारी शेळी, बोकड व मेंढी खरेदीसाठी आले होते. ३१ डिसेंबरचा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात शेळी, बोकड व मेंढ्यांना मागणी होऊन तशा प्रमाणात पुरवठाही मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृहाची सोय बाजार समितीतर्फे करण्यात आली आहे.

08518

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : इराण-इजरायल युद्धावरून सोलापुरात राजकीय वातावरण तापलं

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT