पुणे

कासारीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला

CD

नागनाथ शिंगाडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे, ता.३१ : कासारी (ता. शिरूर) येथील शासकीय तलाव चासकमानच्या पाण्याने तुडुंब भरला आहे. रब्बी पिकासाठी या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. तलावातील पाण्यामुळे गावचा किमान तीन महिन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यामुळे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

योग्य वेळी चासकमानचे पाणी सोडल्याने चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत. ओढ्यावर विविध ठिकाणी पावसाचे पाणी अडवून जलसंधारणाची कामे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहेत. येथील शासकीय तलाव १९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या काळात बांधण्यात आला आहे. तेव्हापासून येथील शासकीय तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. अनेक वर्ष साठलेला गाळ सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का गटामार्फत सकाळ रिलीफ फंडाच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने सन २०११ मध्ये काढण्यात आला होता. तलावातील गाळ काढल्यानंतर पाण्याचा भरपूर साठा होऊ लागला. या तलावातील काढलेला गाळ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेऊन टाकला होता. त्यामुळे जमिनीचा पोतही सुधारला असल्याचे येथील शेतकरी व माजी सरपंच स्वाती भुजबळ, संभाजी भुजबळ व सुनीता भुजबळ, तसेच माजी उपसरपंच सुखदेव भुजबळ, गोपाळ भुजबळ व किरण रासकर, प्रगतशील शेतकरी संदीप भुजबळ, दादाभाऊ काळकुटे, संतोष काकडे, हनुमंत नरके, अनिल नवले व ग्रामस्थांनी सांगितले.
कासारी तलावातील आणखी गाळ काढण्याची गरज निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सांगितले.

08520

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT