पुणे

तळेगावमधील आठवडे बाजार स्थलांतरित

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १९ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे दर सोमवारी रस्त्याच्या कडेला भरणारा आठवडे बाजार सोमवारपासून (ता. १९) वेळ नदीच्या काठालगत सुरक्षित ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे हलविण्यात आल्याने सर्व ग्राहक व विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
येथील आठवडे बाजार अनेक वर्षापासून शिक्रापूर- न्हावरा या महामार्गालगत भरत असल्याने वाहतूक कोंडी होऊन ग्राहक व विक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन रस्त्याच्या कडेला भरणारा बाजार रिकाम्या जागेत हलविला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने मुरूम टाकून या जागेची साफसफाई केली आहे. सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना ही जागा सोईस्कर वाटत आहे. तसेच, आठवडा बाजाराच्या वाहनतळाची बाजार मैदान, स्मशानभूमी, तलाठी कार्यालय, न्हावरा रस्त्याच्या पुलाजवळ, जगताप वस्तीकडे जाणाऱ्या पुलावर सोईस्कर व्यवस्था केली आहे.
पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हावलदार किशोर तेलंग व त्यांचे सहकारी, तसेच सरपंच रोहिणी तोडकर, उपसरपंच सचिन ढमढेरे, अनिल भुजबळ, संदीप ढमढेरे, विशाल आल्हाट, मच्छिंद्र भुजबळ, चिंतामण ढमढेरे, सुनील ढमढेरे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व व्यापारी यांनी हा बाजार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सहकार्य केले.

ग्रामविकास अधिकाऱ्याचे कौतुक
तळेगाव ढमढेरे येथे अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला भरणारा आठवडे बाजार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याने सर्व ग्राहक, विक्रेते, व्यापारी व स्थानिक नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांचे विशेष कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे. बाजाराच्या स्थलांतरामुळे न्हावरा- शिक्रापूर या महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. तसेच, सोमवारी दिवसभर वाहतूक कोंडी झालेली नाही. विशेष म्हणजे सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत ग्रामविकास अधिकारी सात्रस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आठवडे बाजारात स्वतः उपस्थित राहून बाजार सुरक्षित नेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

08619

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT