तळेगाव ढमढेरे, ता. २७ : खंडाळा माथा (ता. शिरूर) येथे शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शिरूर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २० ते २६ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत १९ क्रिकेट संघांतील सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. शिरूर तालुक्यातील भांबर्डे, कारेगाव व न्हावरा मळगंगा इलेव्हन हा सयुक्तिक संघ शिरूर प्रिमीयर लीग २०२६ क्रिकेट स्पर्धेचा चॅम्पियन्स संघ ठरला आहे.
शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मल्हारी गव्हाणे व उद्योजक मंदार पाचुंदकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये शुभम शेळके मालिकावीर, कुणाल खोंड उत्कृष्ट फलंदाज, तर जालिंदर रोडे हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज ठरला. तिघांनाही प्रत्येकी एक सायकल बक्षीस देण्यात आली. गणेश कुटे, सोमनाथ गावडे, राया गव्हाणे, आयुष पोखरकर, नवनाथ इंगळे, रितेश दोरगे, जयश्री दरेकर यांना लकी ड्रॉचे भाग्यवान प्रेक्षक म्हणून प्रत्येकी एक सायकल बक्षीस देण्यात आली. प्रथम विजेता संघाचे संदीप नवले, विशाल पवार व उद्योजक अक्षय बहिरट यांना मानाची चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.
विवेक भवार, विशाल नळकांडे यांनी संयोजन केले. लक्ष्मण मांढरे, प्रशांत पानमंद, प्रवीण कामटकर आदींनी स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (कंसात बक्षीस) :
प्रथम- मळगंगा इलेव्हन भांबर्डे संघ (१ लाख ११११ रुपये व चषक).
द्वितीय - शिक्रापूर इलेव्हन संघ (७७ हजार १११ रुपये व चषक).
तृतीय - साई ब्रँड वॉरिअर्स, निमगाव म्हाळुंगी संघ (५१ हजार १११ रुपये व चषक).
चतुर्थ - महाराज इलेव्हन कान्हूर मेसाई संघ (४१ हजार १११ रुपये व चषक).
पाचवा - भैरवनाथ फायटर्स सणसवाडी संघ (३१ हजार १११ रुपये व चषक)
08641
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.