तळेगाव ढमढेरे, ता.१५ : धानोरे (ता. शिरूर) येथे बाजीराव भोसुरे यांच्या शेतात कृषी विभागातर्फे शेतकरी शेतीशाळेचे आयोजन केले होते. यावेळी
शेतकऱ्यांना महाविस्तार ॲपविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी ऊस शेतीतील खत व्यवस्थापन, संख्या नियंत्रण व खर्च कमी करून उत्पादनवाढ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप डाऊनलोड करण्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना ॲप कसे वापरायचे यासंबंधी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
कार्यशाळेत प्रगतशील शेतकरी जालिंदर ढमढेरे व शहाजी ढमढेरे यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांच्या अनुभवातून शेतकऱ्यांना ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व उत्पादनवाढीचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी अमोल जाधव, शेतकरी बाजीराव भोसुरे, नवनाथ कामठे, मधुकर कोंडे, संजय माशिरे, बाळासाहेब तनपुरे, शहाजी ढमढेरे, बापूराव तनपुरे राजाराम भोरडे, राजेंद्र नाबगे आदी उपस्थित होते.
08702
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.