पुणे

तळेगाव ढमढेरे येथील बाजारात २२०० शेळ्यामेंढ्याची विक्री

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१६: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता.१६) झालेल्या बाजारात सुमारे २२०० शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्री झाली.
बाजारात शेळीला साधारण ९००० ते २५,००० हजार रुपयांपर्यंत तर मेंढीला ५००० ते ९००० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. शेळी, बोकड व मेंढीला आजच्या बाजारात समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, असे बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले व साहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी सांगितले.

प्रशासक हरिश्चंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बाजाराचे उत्कृष्ट नियोजन केले. यामध्ये वाहनांची पार्किंग, खरेदी-विक्रीसाठी प्रशस्त जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह आदी सुविधा बाजार समितीतर्फे पुरविण्यात आल्या होत्या.
आजच्या बाजारात पुणे, अहिल्यानगर, मुंबई, पनवेल, सोलापूर, सातारा आदी ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी बाजारात आले होते. विविध तालुक्यातील शेतकरी व मेंढपाळांनी शेळी, बोकड व मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या.

दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा महात्मा फुले उपबाजार रस्त्यांच्या जाळ्यामुळे अलीकडील काळात महत्त्वाचा ठरला आहे. शिरूर, हवेली, दौंड, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड आदी तालुक्यातील शेतकरी व मेंढपाळांना हा बाजार रहदारीसाठी सुरक्षित वाटतो.

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

रवीना टंडनची एक चूक अन् रातोरात स्टार झाली राणी मुखर्जी! अभिनेत्रीने शाहरुखचा ब्लॉकबस्टर चित्रपट का नाकारला?

Sindhudurg Development : डांबरीकरणाकडून काँक्रिटीकरणाकडे; नवे रस्ते पर्व, ऊन, वारा, पावसात कितपत तग धरणार?

Latest Marathi News Update : १८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद, विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

Pune News : वर्षात १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरास परवानगी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आदेश

SCROLL FOR NEXT