पुणे

तळेगाव ढमढेरे येथे शिक्षक संघटनेचे अधिवेशन

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ५: तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे शिरूर तालुका पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे तालुका अधिवेशन पार पडले. शिक्षकांच्या संच मान्यता, टीईटी परीक्षा, अशैक्षणिक कामे, शिक्षण सेवक पद रद्द करणे आदी विविध प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या वेळी संघटनात्मक बाबींवर चर्चा करून संघटनेची शिरूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे हे प्रमुख मार्गदर्शक तर जिल्हाध्यक्ष युवराज थोरात हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या वेळी संघटनेचे कल्याण कोकाटे, सुरेश खैरे, अंजली शिंदे, संभाजी फराटे, मानसिंग वाकडे, रविंद्र कोहिनकर, सविता भोगावडे, म्हातारबा बारहाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या शिरूर तालुका कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून उमेश धुमाळ तर, महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून शोभा तिकांडे यांची निवड झाली. तसेच, अजित रणसिंग, विलास पुंडे, शरद मुळे, विजय गोसावी, अनिल फुंदे व विकास रासकर आदींचीही विविध पदांवर निवड झाली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष (महिला आघाडी) म्हणून शितल गदादे तर, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून शुभांगी भोसले यांसह विकास गायकवाड, अप्पासाहेब जगदाळे, सोन्याबापू कर्पे यांची निवड झाली. या सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT