पुणे

उमेश धुमाळ यांची शिरूर शिक्षकचे अध्यक्षपदी

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे शिरूर तालुका पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेचे तालुका अधिवेशन पार पडले. या वेळी संघटनात्मक बाबींवर चर्चा करून संघटनेची शिरूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेच्या शिरूर तालुका कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून उमेश धुमाळ तर, महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून शोभा तिकांडे यांची निवड झाली. तसेच, अजित रणसिंग, विलास पुंडे, शरद मुळे, विजय गोसावी, अनिल फुंदे व विकास रासकर आदींचीही विविध पदांवर निवड झाली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये महिला आघाडी उपाध्यक्ष म्हणून शितल गदादे तर, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून शुभांगी भोसले यांसह विकास गायकवाड, अप्पासाहेब जगदाळे, सोन्याबापू कर्पे यांची निवड झाली. या सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे हे प्रमुख मार्गदर्शक तर जिल्हाध्यक्ष युवराज थोरात हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. अधिवेशनात शिक्षकांच्या संच मान्यता, टीईटी परीक्षा, अशैक्षणिक कामे, शिक्षण सेवक पद रद्द करणे आदी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या वेळी संघटनेचे कल्याण कोकाटे, सुरेश खैरे, अंजली शिंदे, संभाजी फराटे, मानसिंग वाकडे, रविंद्र कोहिनकर, सविता भोगावडे, म्हातारबा बारहाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; WTC Points Table मध्येही उलथापालथ; पाहा कोण कोणत्या स्थानी

Murud Crime: मुरुडमध्ये गोमांससदृश मटण विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT