पुणे

तळेगावात ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

CD

नागनाथ शिंगाडे ः सकाळ वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे, ता. १४ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे कुंभारआळी परिसरात वेळ नदीच्या काठावर असलेली जुन्या काळातील विहीर धोकादायक अवस्थेत आहे. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यालगत वळणावरच असलेल्या विहिरीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी ही विहीर जीवघेणी ठरू शकते.

विहीर वापराविना पडून
यापूर्वी ग्रामपंचायतीने अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळील उघड्या विहिरीला सुरक्षित जाळी बसवून ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतली होती. मात्र, कुंभारआळीतील या विहिरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पूर्वी या विहिरीच्या पाण्याचा वापर होत होता. परंतु, नवीन कूपनलिका झाल्यामुळे आता ही विहीर दुर्लक्षित आणि पाण्याने तुडुंब भरलेली आहे. सुरक्षिततेसाठी येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

संरक्षणात्मक उपाययोजनांचा अभाव
परावर्तक नाही
संरक्षण जाळी नाही
चेतावणी फलक नाही
उंच कठडे नाहीत

रस्त्याच्या कडेला असलेल्या विना वापरातील धोकादायक उघड्या विहिरीला आठवडाभरामध्ये लोखंडी जाळी बसवण्यात येईल. त्यामुळे संभाव्य धोका कायमस्वरूपी टळणार आहे.
- रोहिणी तोडकर, सरपंच, तळेगाव ढमढेरे

या विहिरीला उंच गोल कठडे बांधून त्यावर लोखंडी जाळी बसवण्याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच ग्रामपंचायतीला दिला आहे. मात्र, निधीअभावी किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे हे काम अद्याप प्रलंबित आहे. सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने पाहून त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे.
- कीर्ती गायकवाड, माजी उपसरपंच

08954

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT