पुणे

कासारीत बिबट्याची दहशत कायम

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १० : कासारी (ता. शिरूर) परिसरात बिबट्याने गुरुवारी (ता. ९) पहाटे जाळी तोडून एका शेळीचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोंढापुरी हद्दीतील कासारी शिव रस्त्याजवळ मेंढपाळ श्रीकांत महादेव चोरमले यांचा मेंढरांचा कळप मुक्कामी होता. रात्रीच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सभोवताली जाळी लावली होती. मात्र, गुरुवारी पहाटे बिबट्याने ही जाळी तोडून एका शेळीवर हल्ला केला व तिला उसाच्या शेतात ओढून नेऊन ठार केले. या हल्ल्यात मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यापूर्वीही कासारी परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले असून, वनविभागाने परिसरात योग्य ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune police recruitment success : गरीब गरीब म्हणून रडला नाही तर लढला, एसटीचीही सुविधा नसलेल्या जतचा रोहन पुणे पोलीस दलात

Yamuna Boat Capsized: मोठी बातमी! यमुना नदीत बोट उलटली; १० प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, घटना कशी घडली?

Mahatma Phule: जन्म द्विशताब्दी वर्षातच फुलेंच्या विचार साहित्याचा शासनाला विसर! शासकीय ग्रंथागारात पुस्तकं उपलब्धच नाहीत; फुले साहित्यप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

Kumbh Mela Viral Girl Monalisa: मोनालिसा अल्पवयीन असल्याचं तपासात उघड, फरमान खानवर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा; कुंभमेळ्यात झाली होती व्हायरल

Mumbai News: मेट्रो-१० ला गती; पॉड टॅक्सीचा प्लॅन तयार! मुंबईनंतर 'या' तीन शहरांमध्ये पॉड टॅक्सी सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT