पुणे

तळेगाव बाजारात सुविधांची वानवा

CD

नागनाथ शिंगाडे ः सकाळ वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे, ता. २० : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात सुमारे १५ ते २० गावांतील ग्राहक व विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र, या बाजारात बहुतांश मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत असून, नागरिक व विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्रापूर- न्हावरा महामार्गालगत बाजार भरत असल्याने गर्दीचे नियोजन करणे ग्रामपंचायतीसमोर आव्हान ठरत आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे भविष्यात बाजारासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विक्रेत्यांसाठी ओटे, शेडची सुविधा नाही
बाजारात विक्रेत्यांसाठी ओटे, तसेच ऊन व पावसापासून संरक्षणासाठी शेडची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. बाजारात प्रकाशाची काही प्रमाणात सोय असून, विद्युत खांबांवर फक्त तीन ठिकाणी एलईडी दिवे बसविले आहेत.

वाहतूक कोंडी नित्याची
बाजारासाठी स्वतंत्र वाहनतळाची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहनचालक, ग्राहक व विक्रेत्यांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी पोलिस ठाण्याशी पत्रव्यवहार केला असून, पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातात. तसेच, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सूचनाफलकही लावले आहेत.

शौचालयाची दुरवस्था
बाजारतळावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये असली तरी ती अस्वच्छ अवस्थेत असून, वापरासाठी अयोग्य आहेत. शौचालयात पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही
बाजारात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेली नाही. त्यामुळे ग्राहक व विक्रेत्यांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.

करवसुली
प्रत्येक विक्रेत्याकडून- ५० ते २०० रुपये आकारणी
दर सोमवारी २५ ते ३५ हजार रुपयांपर्यंत ग्रामपंचायतीला कर

मोबाईल चोरांचा प्रश्न गंभीर
सुरक्षेच्या बाबतीत महिला विक्रेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून, बाजारात होणारी पाकीट मारी मोठ्या प्रमाणात होत असते. अनेकांचे मोबाईल व दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दर सोमवारी मोबाईल चोरीच्या घटना बाजारात घडत आहेत. अनेकांनी मोबाईल चोरीच्या तक्रारी केल्या, परंतु पोलिसांना अद्याप मोबाईल चोर सापडलेले नाहीत.

तळेगाव ढमढेरे येथील दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात विविध सुविधा पुरविण्यासाठी आगामी काळात ग्रामपंचायतीतर्फे शक्य तेवढे प्रयत्न केले जातील.
- चेतन वाव्हळ, ग्रामविकास अधिकारी

08991

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ७ दिवस पाणीकपात होणार; कोणत्या भागांना फटका बसणार?

भेंडवळच्या अंदाजाला श्याम मानव यांचं आव्हान, ९० टक्के अचूकता सिद्ध केल्यास ८० लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा

Latest Marathi News Live Update : अकोला नाका ते राजाकिन्ही हा मुख्य रस्त्यावर धोका वाढला; दिवसभर वाहतूक कोंडी

स्वराज्यासाठी लागतो तो विद्रोह ! रितेश देशमुखच्या बहुप्रतीक्षित 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षक म्हणाले.

Pune News : नारी शक्ती सन्मान विधेयकावरून भाजप - काँग्रेस आमनेसामने; सभागृहात गोंधळाचे वातावरण

SCROLL FOR NEXT