पुणे

बाजारभावाअभावी कांदा उत्पादक मेटाकुटीला

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ६ : कांद्याला अल्प बाजारभाव असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
तालुक्यात शेतकरी उसाच्या उत्पादनाबरोबरच कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. लागवडीपूर्वी शेताची नांगरट व इतर मशागत करावी लागते. लागवडीनंतर खुरपणी, खत, पाणी व कांदा काढणी आदी मशागतीची विविध कामे शेतकऱ्यांना करावी लागतात. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढ चालला आहे.
सध्या तीव्र उष्णतेमुळे विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला असून, पाणीटंचाईमुळे कांद्याला योग्य पाणीपुरवठा होत नाही. पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे.


कांदा काढण्यासाठी मिळेना मजूर
कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाले तर उष्णतेमुळे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतच काम करतात. ३०० ते ४०० रुपये कांदा काढण्यासाठी शेतमजुरांना रोजंदारी द्यावी लागत आहे. रोजंदारी देऊनही शेतमजुरांची टंचाई भासत आहे.

सध्या बाजारामध्ये कांद्याला ८ रुपये पासून ते १२ रुपयेपर्यंत प्रतिकिलोला बाजारभाव मिळत आहे. बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीचा खर्चही निघत नाही. सकारने कांद्याला हमीभाव द्यावा.
- संतोष काकडे, शेतकरी, कासारी

09096

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

SCROLL FOR NEXT