पुणे

टाकळी येथे डाळिंबाच्या बागेला नायलॉन कपड्याचे आच्छादन

CD

टाकळी हाजी, ता. ४ : तीव्र उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील शेतकऱ्यांनी डाळिंब बागेचे संरक्षण करण्यासाठी नायलॉनच्या पांढऱ्या कापडाचे (क्रॉप कव्हर) आच्छादन घातले आहे. यामुळे येथील सर्व बागा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत.

चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शिरूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले आहेत. तालुक्यातील पश्चिम भागात माळरानावरील हजारो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत. डाळिंबाचे उत्पादन केल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी समृद्धी आली आहे. टाकळी हाजी गावामध्ये यावर्षी सुमारे दीड ते दोन लाख रोपांची लागवड झाली आहे. सध्या डाळिंबाची फळ लगडलेली आहे.

सध्या फळाचे संरक्षण होण्यासाठी विविध कीटक व बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी केली जात आहे. मात्र, सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून शिरूर तालुक्याचे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला डाळिंब फळास उन्हाचे चटके बसून डाग पडण्याची भीती वाटत आहे. फळ कितीही मोठे झाले पण त्यावर जर उन्हामुळे डाग आला तर किंमत मातीमोल मिळते. त्यामुळे डाळिंब फळाचे उन्हापासून संरक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी नायलॉनचे कापड खरेदी केले असून हे कापड संपूर्ण बागेवर झाडाच्या वर दोन ते तीन फूट बांधून त्याला बांबूने आधार दिला आहे.

कापड, बांबू, मजुरी या साठी एकरी ४० हजार रुपये खर्च होत आहे. सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चांदी होणार असल्याने शेतकरी ही मोठ्या आशेने खर्च करून डाळिंबाला जिवापाड जपत आहेत. चांगल्या डाळिंबाला निर्यातीसाठी मोठी व्यापारी वर्ग शेताच्या बांधावरून जाऊन डाळिंबाची खरेदी करतात.


उन्हाचे चटके डांळीब फळाला बसू नये म्हणून, फळास क्रॉप कव्हरचे अच्छादन अंत्यत महत्त्वाचे आहे. त्यामुळे फळाचा दर्जा उत्तम निघतो व बाजारही चांगला मिळतो.
- सिद्धेश ढवळे, कृषी अधिकारी शिरूर

बागेच्या संरक्षणासाठी पूर्वी कधीच डाळिंबाला क्रॉप कव्हर वापरले नाही. मात्र, आता उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यापासून वाचण्यासाठी क्रॉप कव्हरचा प्रयोग प्रथमच टाकळी हाजी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहे.
- देविदास पवार, डांळीब उत्पादक
00047

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT