पुणे

टाकळी हाजी, जांबुत परिसरात चोरीचे सत्र सुरू

CD

टाकळी हाजी, ता. ९ : मोटारीतील केबली, रोहित्र, डांळीब, आंबे चोरीचे सत्र बेट भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलिसांचा धाक उरला नसल्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

जांबुत (ता. शिरूर) येथे कुकडी नदी काठावरच्या शेती पंपाच्या दहा ते बारा शेतकऱ्यांच्या केबली चोरी जाण्याचे सत्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जांबुतचे सरपंच दत्तात्रेय जोरी केली आहे.

बेट भागामध्ये रोहित्र व केबल यामधील तांब्याच्या तारा काढून त्या विकण्याचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. शेतीपंपाच्या केबल चोरून त्या एका ठिकाणी जाळल्या जातात. त्यामधील तांब्याची तार काढून ती विकली जाते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असला तरी, या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. नदी काठावरील प्रत्येक शेतकऱ्यांची चार-पाच हजार रुपयांची चोरी होत आहे. नवीन केबल बसवली की, पुन्हा चोरांचा त्यावर डोळा असतो. त्यामुळे केबली टाकायच्या तरी किती वेळा, असा संप्तत सवाल शेतकरी करीत आहे.

तीन दिवसांच्या कालावधीत जांबुत गावातून दहा ते बारा शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबलींची चोरी झाली. सध्या डाळिंबाला चांगला बाजार भाव आल्यामुळे टाकळी हाजी परिसरामध्ये डाळिंबाची ही मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच आंबा बागेतूनही आंब्याच्या फळांची चोरी केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतामध्येच मुक्काम टाकून आपल्या फळांचे राखण करीत आहेत.
- दत्तात्रेय जोरी, सरपंच, जांबुत

पोलिसांनी दखल घेण्याची मागणी
या परिसरात परिसरात प्रथमच चोरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला असून रोज कुठे ना कुठेतरी रोहित्र, केबल, डाळिंब याची चोरी झाल्याच्या बातम्या शेतकऱ्यांकडून मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून पोलिस खात्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.

चोरांच्या मनामध्ये पोलिसांच्या बद्दल कोणतीही धाक उरला नाही. त्यामुळे रोज शेतकऱ्यांच्या रोहित्र, केबल, डाळिंब याची चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दाद मागावी, तरी कोणाकडे?
- संजय गुरव, शेतकरी, जांबुत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT