पुणे

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जांबूतला ग्रामस्थांचा रास्ता रोको

CD

टाकळी हाजी, ता.२७ : जांबूत (ता.शिरूर) येथे महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला व रास्ता रोको केले. मात्र, वनविभागाने बिबट्याला आठ दिवसांत जेरबंद करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. वन विभागाने तात्काळ परिसरात दहा पिंजरे लावून बिबट्या जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीमच्या माध्यमातून तयारी केली आहे.
लेखी आश्र्वसनाशिवाय मृतदेह अंत्यविधीसाठी गावातून हलविणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी तालुका वन परीक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी लेखी आश्वासन देण्याचे कबूल केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती देवदत्त निकम, माजी पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, शेखर पाचुंदकर, सरपंच दत्ता जोरी, नाथा जोरी, बाळासाहेब फिरोदिया, बाळासाहेब कड बाळासाहेब बदर, पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर आदी उपस्थित होते.
घटनास्थळी जुन्नर उपवनसंरक्षक अधिकारी अमोल सातपुते, सहाय्यक उपस्थित संरक्षक अधिकारी अमित भिसे यांनी भेट दिली .

वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी
सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला वनविभागाच्या संबंधित कामासाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या जुन्नरच्या वन विभागाच्या कारभाराबाबत मात्र यावेळी ग्रामस्थांनी नाराज व्यक्त केली. आम्हाला कागदी घोडे नाचत नियम शिकविणारे साहेब आता कुठे आहेत असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.

00304

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT