पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात फाकटे येथे दोन शेळ्या ठार

CD

टाकळी हाजी, ता. ७ : फाकटे (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला करीत दोन शेळ्या ठार केल्या आहेत.
फाकटे येथील योगेश सावकार शितोळे यांचे शेतात घर असून, घराशेजारील गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. बिबट्याने सहा फूट लोखंडी तारेवरून रात्री उडी मारून गोठ्यात प्रवेश केला. त्यानंतर तेथील दोन शेळ्या ठार केल्या. या बिबट्याच्या हल्ल्यामुळे योगेश शितोळे या शेतकऱ्याचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, वनरक्षक लहू केसकर महेंद्र दाते यांनी पंचनामा केला आहे.
बेट भागात सध्या ऊसतोडीचे काम सुरू असून, अनेक बिबटे उसाच्या बाहेर पडू लागले आहेत. ठिकठिकाणी शेतकऱ्यांना बिबटे दिसत असल्यामुळे पालक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. कांदा लागवडीची कामे सुरू झाली असून, उसाशेजारील शेतात लागवड करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागत आहे. अनेक ठिकाणी ऊसशेतीच्या मधून रस्ते जात असून, या रस्त्यांनी जाताना शालेय विद्यार्थी व महिलांना मोठी काळजी घ्यावी लागत आहे. ‘‘शेतकऱ्यांनी पशुगणना करून घेऊन पशूंच्या कानाला टॅग लावून घ्यावा. नैसर्गिक आपत्ती व बिबट्याच्या हल्ल्याने नुकसान झाल्यास शेतकऱ्याला नुकसानभरपाई देणे शक्य होते,’’ असे आवाहन शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Latest Marathi News Live Update : गॅस टंचाईमुळे लग्नसराईत अडचण; दोन हजार पाहुण्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

स्टार प्रवाहवरची 'ही' नायिका आहे तेजश्री प्रधानची बेस्ट फ्रेंड; शेअर केला फोटो; म्हणाली, 'ती माझी सपोर्ट सिस्टीम...'

SCROLL FOR NEXT