पुणे

टाकळी हाजीतील दोघांवर अतिक्रमणप्रकरणी गुन्हा

CD

टाकळी हाजी, ता. ११ : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील साबळेवाडी गावठाण जागेवर अतिक्रमण करत तारेचे कुंपण तोडल्याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात पिता- पुत्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
टाकळी हाजीचे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र खराडे यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्याला फिर्याद दिली असून, त्यानुसार भागा हरी भाईक व विश्वनाथ भागा भाईक या पिता- पुत्रांच्या विरोधात विरोधात सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
साबळेवाडी येथे ग्रामपंचायतीची दोन हेक्टर ६१ आर गावठाण जागा असून, या जागेवर येथील स्थानिक लोकांनी अतिक्रमण केले होते. ते काढण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष मोहन साबळे यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तामध्ये मार्च २०२५ रोजी सरपंच अरुणा घोडे व सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सरकारी मोजणी पूर्ण करीत या ठिकाणचे अतिक्रमण काढून गावठाण जागेला तारेचे कुंपण घातले होते. त्यानंतरही या लगतच्या असलेल्या शेतकऱ्याने पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळेस त्याला समज देऊन पोलिसांनी सोडले. मात्र, याच भाईक पिता पुत्रांनी पुन्हा अतिक्रमण करीत संरक्षण जाळी, कुंपण तोडली असून, त्यामध्ये मका पेरली आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुन्हा पोलिस ठाण्याला तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार शिवाजी बनकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT