पुणे

पंप बसण्याचा मिळेना अद्याप खर्च

CD

टाकळी हाजी, ता.९ : सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून अतिरिक्त खर्च करून घेणाऱ्या एजन्सीजचा प्रकार अजूनही थांबलेला नाही. विविध कामांसाठी शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. एप्रिल महिन्यात ‘सकाळ’ने यावर वृत्तमालिका प्रसिद्ध करून हा प्रकार उघडकीस आणला होता. तरीदेखील अद्याप टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पंप बसवण्यासाठी केलेल्या खर्चाची भरपाई मिळालेली नाही.

महावितरणकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सौर पंपाचे सर्व काम एजन्सीकडून केले जाणे अपेक्षित आहे. यात खड्डे खोदणे, साहित्याची वाहतूक, वाळू-सिमेंट खरेदी, तसेच मजूर पुरवठा हे सर्व समाविष्ट आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक एजन्सीज शेतकऱ्यांकडून हे सर्व काम करून घेत आहेत.

साहित्य गोडाऊनवरून घेऊन जा, तुम्हीच खड्डा खोदा, सिमेंट-वाळू आणा, मजूर द्या, तरच पंप उभारून देऊ. गरजेपोटी शेतकरी ही कामे करतात. या बाबत सकाळमधे आवाज उठविल्यानंतर तत्कालीन शिरूरचे उपअभियंता सुमीत जाधव यांनी शेतकऱ्यांच्या समवेत चर्चा करून त्यांच्या लेखी तक्रारी घेतल्या, त्यांचा अहवाल मुख्य अभियंता बारामती यांना मे महिन्यात पाठविण्यात आला, मात्र तरी सुद्धा आजपर्यंत त्यांना हा खर्च परत मिळालेला नाही. दरम्यान, तक्रारींच्या एजन्सींना काळ्या यादीत टाका, असे शेतकरी राजेंद्र गावडे यांनी सांगितले.


प्रतिनिधींच्या पत्राकडेही दुर्लक्ष
याबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ऊर्जामंत्री, ऊर्जा संचालक व महावितरणचे बारामती येथील मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. मात्र, अजून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

ज्या एजन्सींविरुद्ध तक्रारी आहेत, त्या कंपन्यांना कामे देणे थांबवावे. शेतकऱ्यांकडून दबावाने लेखी तक्रार मागे घेण्याचा प्रयत्नही होत आहे. सौर पंप बसविताना महावितरणच्या वायरमनपासून ते बसविणाऱ्या एजन्सीपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे .
- राजेंद्र गावडे (माजी संचालक, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती)

सौर कंपनीच्या एजन्सीकडून फाकटे ते टाकळी हाजी पंप वाहतूक, वाळू-सिमेंट, खड्डे खोदणे, प्लेट बसविण्याची सर्व कामे आम्हालाच करायला लावली. त्यासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च झाला.
- देवीदास पवार (शेतकरी, टाकळी हाजी)

सौर पंपा संदर्भात १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ या तक्रार निवारण क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता
दीपक लहामगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT