पुणे

डोंगरगण चौफुला येथे तरुणास मारहाण

CD

टाकळी हाजी, ता. १ : इन्स्टाग्रामवर पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून डोंगरगण चौफुला (ता शिरूर) येथे एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी अडीचच्या सुमारास टाकळी हाजी- शिरूर रस्त्यावर डोंगरगण चौफुला येथील हॉटेलमध्ये घडली. या बाबत रोहन मळीभाऊ खामकर (वय २१, व्यवसाय- वेल्डिंग, रा. शिनगरवाडी) याने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन हा हॉटेल स्वरा येथे फॅब्रिकेशनचे काम करीत असताना अमर मुंजाळ (रा. डोंगरगण), हर्षद खाडे, करण चव्हाण (दोघे रा. म्हसे बु.) व सचिन पवार (पत्ता अज्ञात) हे तेथे आले. यांनी रोहनला एकत्रितपणे लाकडी दांडके, हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हातावर, डोक्यावर व तोंडावर गंभीर दुखापती झाल्या. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार प्रशांत गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT