पुणे

पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याचा अंत

CD

टाकळी हाजी, ता. ५ : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे मंगळवारी (ता. ४) थर्मल ड्रोनच्या प्रकाशात बिबट्याचे चमकणारे डोळे...हवेत घुमणारी डरकाळी...तणावाने भरलेली रात्रीची शांतता...शार्प शूटरने पहिला डार्ट मारला, पण तो चुकला अन्‌ बिबट्या गुरगुरत शार्प शूटरवर झेपावला... क्षणभर सगळं स्तब्ध झालं, आणि मग... एक गोळी सुटली अन्‌ रात्री १०.३० वाजता नरभक्षक बिबट्याचा शेवट झाला, आणि मोहीम फत्ते झाली.
शिरूर तालुक्यातील घोड व कुकडी नदीचा शेतीने समृद्ध म्हणून ओळखला जाणारा बेट भाग आता बिबट्यांच्या हल्ल्याने चिमुरड्या लेकरांच्या किंकाळीने रक्ताळला आहे. पिंपरखेड ,जांबूत दोन गावांत २० दिवसांमध्ये दोन चिमुरड्यासह एका आजीचा जीव गेल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून आला. जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते. तसेच २ नोव्हेंबरला संतप्त जमावाने वनविभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग सुमारे १८ तास रोखून धरला होता. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढला होता. सोमवारी (ता. ३) नरभक्षक झालेल्या बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती. नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था, पुण्याचे डॉ. सात्त्विक पाठक पशू चिकित्सक, जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोलकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळी तळ ठोकून होती. नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यासाठी ही टिम दोन दिवसांपासून उसाचे शेत, बांध, वावरामधून बिबट्यांच्या पावलांच्या शोध घेत माग घेत होते. पहिल्या दिवशी त्यांनी दिवसभरात परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण केले. बिबट्यांच्या ठिकाणी पिंजरे लावले होते. लोकांची गर्दी खूप असल्याने काम करण्यासही त्यांना अडथळा येत होता; मात्र मंगळवारी रात्री अंधार पडल्यानंतर या शार्प शुटरची सूत्रे हलली आणि काहीही करून बिबट्याला जेरबंद करायचाच असा निर्धार करीत मोहीम फत्ते केली.

अशी केली मोहीम फत्ते
बिबट्याने रोहनला ज्या ठिकाणी मारले त्या परिसरात तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून मंगळवारी (ता. ४) रात्री बिबट्याचा शोध घेतला. रोहनच्या घरापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट दिसून आला. शार्प शूटर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला; परंतु तो अपयशी ठरला. तसा बिबट चवताळून हल्ला करीत होता. हा बिबट्या शरीराने धिप्पाड होता. त्याने शार्प शुटरवरही अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर बंदूकधारी शार्प शूटर यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास गोळी झाडली, अन् क्षणात चवताळणारा बिबट्या जमिनीवर कोसळतच सर्व टीमने सुटकेचा निःश्वास सोडला.

नर बिबट ६४ किलो वजनाचा होता
नरभक्षक बिबट्याचे शव पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर शवशवविच्छेदना करिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले आहे. ही कारवाई अंत्यत गुप्त ठेवण्यात आली होती. रात्रभर वन अधिकारी व शार्प शूटर टिम काम करीत होती. नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले असून तो नर बिबट्या ६४ किलोचा होता अशी, माहिती पहाटे चारच्या सुमारास ही माहिती वन अधिकारी यांनी दिली. ही कारवाई पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, साहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केली आहे.

...तरच आमचे लेकरं बाळाचे जीव वाचतील
बिबट्याला पिंजऱ्यात ठेवू नका, आता यांना गोळ्याच घाला तरच आमचे लेकरं बाळाचे जीव वाचतील, त्यांनी आमच्या डोळ्या देखत आमची लेकरे मारली त्यालाही आमच्या समोरच मारा, अशी आर्त हाक पंचक्रोशीतील मायमाउली करू लागल्या आहेत .


वीस दिवसांत तिघांचा बळी
तारीख***नाव***वय
१२ ऑक्टोबर*** शिवन्या शैलेश बोंबे*** ५ वर्षे ६ महिने
२२ ऑक्टोबर***भागूबाई रंगनाथ जाधव***८२
०२ नोव्हेंबर***रोहन विलास बोंबे***१३


रोहनला ज्या ठिकाणाहून बिबट्याने ओढत नेऊन ठार केले, त्या ठिकाणापर्यंत बिबट्यांच्या पावलांचे ठसे रेस्क्यू टीमने घेतले होते, त्यांचे ठसे व ठार केलेल्या बिबट्यांचे ठसे जुळले. त्यानंतर मोहीम राबविली.
-निळकंठ गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी

या पूर्वी २०२० मध्ये करमाळा (जि. सोलापूर) परिसरात अशीच कारवाई केली होती. त्या परिसरात १९ नागरिकांना नरभक्षक बिबट्याने ठार मारले होते. या मोहिमेत ४५० वन अधिकारी कर्मचारी हे हेलिकॉप्टरसह तैनात होते. त्या मोहिमेत डॉ चंद्रकांत मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले आहे. त्यानंतर ही कारवाई केली.
- डॉ. धनंजय कोकणे, मानद वन्य जीवरक्षक, पुणे

0756

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT