पुणे

टाकळी हाजी आरोग्य केंद्र ठरतंय ‘आदर्श’

CD

टाकळी हाजी, ता ९ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १०० ते १२५ रुग्ण उपचारासाठी येत असून, या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे केंद्र जिल्ह्यातील आदर्श आरोग्य केंद्रांपैकी एक ठरत आहे.
टाकळी हाजी (ता. शिरूर) या केंद्रात डॉ. नामदेव पानगे व डॉ. मनोज सूर्यवंशी हे दोन वैद्यकीय अधिकारी कायम मुक्कामी राहून २४ तास आरोग्यसेवा पुरवतात. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार, तसेच प्रसूती आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसारख्या सेवा अखंड सुरू असतात. महिन्यात काही सुट्टीचे दिवस वगळता, सरासरी ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण या केंद्राचा लाभ घेतात. या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जांबूत, पिंपरखेड, फाकटे आणि वडनेर ही उपकेंद्रे येतात. सकाळी नऊ वाजता रुग्णसेवेला प्रारंभ होतो आणि रुग्ण येईपर्यंत सेवा सुरूच ठेवली जाते, अशी माहिती डॉ. नामदेव पानगे यांनी दिली. प्रसूती रुग्ण अंकिता किसन पवार व गीता सुभाष देवीकर यांनी सांगितले की, “आमची प्रसूती पूर्णपणे नैसर्गिक झाली. डॉक्टर व परिचारिका यांनी अत्यंत उत्तम काळजी घेतली. तसेच चहा, नाश्ता व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली असून रुग्णालय परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला आहे.” या प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा पूर्वीपासूनच उत्तम राहावा यासाठी अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सातत्यपूर्ण सेवा, स्वच्छता व रुग्णाभिमुख दृष्टिकोन यामुळे टाकळी हाजीचे आरोग्य केंद्र जिल्ह्यात एक आदर्श ठरत आहे.


0767

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT