पुणे

वडनेरमध्ये रंगला बैलगाडा शर्यतींचा थरार

CD

टाकळी हाजी, ता. ११ : श्री गुरुनाथ महाराज काकडा महोत्सवानिमित्ताने वडनेर (ता. शिरूर) येथे तीन दिवस बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. पारंपरिक संस्कृतीचा रंग आणि वेगाचा थरार अनुभवण्यासाठी परिसरातील शेतकरी, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शर्यतीत सहभागी झालेल्या प्रत्येक बैलजोडीने ताकद, वेग आणि जिद्द याचे दर्शन घडवले. गडगडणाऱ्या चाकांसोबत पांढऱ्या शुभ्र बैलांच्या शरीरावरील घामाचे थेंब चमकत होते, अन् मालकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दूरवरच्या जिल्ह्यांतून व तालुक्यांतून अनेक बैलगाडा शौकीन स्पर्धेत सहभागी झाले होते.विजेत्या बैलगाड्यांसाठी लाखो रुपयांची बक्षीसे ठेवली होती. वेग, नियंत्रण आणि समन्वयाच्या कसोटीवर ठरणाऱ्या या स्पर्धेत अनेक प्रसिद्ध जोडीदार बैलांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शर्यतीच्या मैदानावर गर्दी उसळली होती.
ढोल- ताशांच्या गजरात, पारंपरिक पोशाखात आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जोडीदार बैलांना शुभेच्छा देत मैदानात उतरण्यापूर्वी नारळ फोडून सुरुवात केली. यामध्ये ५०५ बैलगाडे धावले. त्यामध्ये प्रथम क्रमांकात ४९, द्वितीयमध्ये १९२, तृतीयमध्ये १०५ गाडे आले. कै. बबन खेडकर हा १० मिनीट २५ सेकंदात घाटाचा महाराजा ठरला. घाटाचा राजामधे यशवंत वाळुंज, संतोष बोरकर व तुषार निचित व अरुण निचित यांच्यात जुगलबंदी झाली.
या बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, डॉ. सुभाष पोकळे, दामू घोडे, बाळासाहेब डांगे, सागर दंडवते, नवनाथ निचित, मारुती निचित, सरपंच सुरेखा निचित यांनी भेटी दिल्या. या शर्यतीचे आयोजन श्री गुरुनाथ बैलगाडा संघटना गुरुनाथ स्पोर्ट क्लब व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या .

फळीफोड ठरलेले गाडे
प्रथम रामदास बाबूराव रोडे, द्वितीय योगेश बोदगे, सचिन आढाव, तृतीय नीलेश कर्डिले, विश्वनाथ शेंडगे यांच्यात जुगलबंदी झाली.

00788

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: टीम इंडियाला धक्का! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टार फलंदाज खेळणार नाही, कारण...

Pune Traffic: कार्तिक यात्रेनिमित्त पुण्यात उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल; पालखीमार्ग टाळण्याचं आवाहन

Pimparkhed News : बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांसाठी वनमंत्री गणेश नाईक उद्या भेटीस येणार !

Delhi Blast: आत्मघातकी हल्ला नाही! सुरक्षा यंत्रणांच्या दबावामुळे गडबडीत केला स्फोट; अपुऱ्या क्षमतेचा ब्लास्ट, सूत्रांची माहिती

Latest Marathi Breaking News : डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, पोलिस अलर्टवर

SCROLL FOR NEXT