पुणे

पिंपरखेडला सोळावा बिबट्या जेरबंद

CD

टाकळी हाजी, ता. २० : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील रामहरी बोंबे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्री (ता.१९) सोळावा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे वनविभागाने येथील परिसरात ३६ पिंजरे लावले होते. त्यात १२ ऑक्टोबर ते आतापर्यंत १६ बिबटे जेरबंद करण्यात आल्याची माहिती वनविभागाचे वनरक्षक लहू केसकर दिली.

पिंपरखेड येथील बिबट्यास गुरुवारी (ता.२०) सकाळी वनकर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. यावेळी वनरक्षक केसकर यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बिबट्यांच्या हालचालींना आळा बसू लागला आहे. वनविभागाने केलेल्या कारवाईत १६ बिबटे जेरबंद केले आहेत. पिंपरखेड तसेच जांबूत परिसरातील गावांत ३६ पिंजऱ्यांमधून बिबटे जेरबंद केले आहेत. सततच्या गस्त पथकाच्या हालचालींमुळे आणि पिंजऱ्यांच्या प्रभावी व्यवस्थेमुळे ही मोहीम यशस्वी ठरली. दरम्यान, आतापर्यंत जेरबंद केलेल्या सर्व बिबट्यांना प्राथमिक आरोग्य तपासणीनंतर बिबट निवारण केंद्रात सुरक्षित स्थलांतरित केले आहे.


बिबट्यांची दहशत वाढल्याने पिंपरखेड, जांबूत, टाकळी हाजी आणि आसपासच्या गावांत वनविभागाने गस्त वाढवून पिंजरे लावण्याची मोहीम राबवली होती. परिणामी बिबट्यांचे पकडण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पुढील काळात अशा घटना कमी करण्यासाठी ग्रामस्थांनी वनविभागाकडे सौरकुंपण, सोलर लाइट्स, सायरन व्यवस्था आणि जनजागृती मोहिमा वाढवण्याची मागणी केली आहे.

00812

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT