टाकळी हाजी, ता. २९ : फाकटे (ता. शिरूर) येथे शनिवारी (ता. २९) सकाळी सात वर्ष वय असलेला नर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
बेटभागातील विशेषतः पिंपरखेड, जांबूत (ता. शिरूर) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मोठा उच्छाद सुरू असून काही नागरिकांचे प्राणही गेले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने शासनाच्या आदेशानुसार बिबटे पकडण्याची मोहीम तीव्र केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले की, ‘‘परिसरातील वाढत्या हालचालींमुळे आमची यंत्रणा २४ तास सतर्क आहे. दोन-तीन, कधी कधी चार-पाच दिवसांनी एखादा का होईना बिबट्या पिंजऱ्यात अडकतो आहे. बिबटे पूर्णपणे या परिसरातून कसे हलवता येतील यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.’’
दरम्यान, भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कृत्रिम जंगलासारखे वातावरण तयार झाले आहे. यामुळे बिबट्यांना सुरक्षित लपण्याची जागा मिळते. जंगलात पिल्ले सहज न जगणारी परिस्थिती असताना उसामध्ये मात्र ती सुरक्षित वाढतात. त्यामुळे बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून ते या भागातून हलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे मानवी जीवनावर मोठा धोका निर्माण झाला आहे. मानवावर होणारे हल्ले १०० टक्के रोखण्यासाठी परिसरातील सर्व बिबटे पकडून वनतारा किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये स्थलांतरित करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
ड्रोनच्या माध्यमातून शोधून...
परिसरातील विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत; मात्र याआधी पकडले गेलेले आणि वनविभागाने मोकाट सोडलेले बिबटे पुन्हा पिंजऱ्यात अडकत नाहीत. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून बिबट्यांना बेशुद्ध करून पकडण्याची मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
0823
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.