पुणे

फाकटे गावातील विहिरीत पडलेला बिबट्याला सुखरुप

CD

टाकळी हाजी, ता. ३ : फाकटे (ता. शिरूर) येथे गावकऱ्यांची सतर्कता आणि वनविभागाची तत्परता यामुळे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
फाकटे गावातील शेतकरी नवनाथ दत्तू शेलार यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. विहिरीत हालचाल जाणवताच शेलार यांनी तत्काळ वनरक्षक लहू केसकर यांच्याशी संपर्क साधला. वन विभागाचे पथक व ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. विहिरीत दोरीच्या साहाय्याने पिंजरा सोडून बिबट्याला सुरक्षितरीत्या वर खेचण्यात यश आले. प्राथमिक तपासणीत हा बिबट मादी असून अंदाजे तीन वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. रेस्क्यू झालेल्या बिबट्याला पुढील उपचार व निगा राखण्यासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले. ग्रामस्थांचे तत्पर सहकार्य आणि वन विभागाची दक्षता यामुळे कोणतीही हानी न होता बचावकार्य यशस्वीरीत्या पार पडले.
0825

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT