टाकळी हाजी, ता. ८ : ‘‘जुन्नर वनविभागाच्या इतिहासात शूट आउट ऑपरेशन हे पिंपरखेड (ता. शिरूर) येथूनच घडले. त्यामुळे तब्बल ४७ बिबट आपण जेरबंद करू शकलो; हे यश प्रशासनासह ग्रामस्थांचे आहे. बिबट- मानव संघर्ष मोठा असून, वनविभाग व नागरिक यांच्या समन्वयातून यावर मार्ग काढू शकतो,’’ असे प्रतिपादन प्रतिपादन सहायक वनसंरक्षण अधिकारी स्मिता राजहंस यांनी केले.
पिंपरखेड येथे मानव- वन्यप्राणी संघर्ष कार्यशाळा कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी वनविभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शासनाकडून सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चांदपूर यांच्या सुशील सहारे, सौमित्र तिजारे, राकेश निमसरकार यांच्या माध्यमातून बिबट उपाययोजनांसंदर्भात प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. यावेळी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते, शिरूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माउली ढोमे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बांबे, देवराम ढोमे, शिक्षिका प्रियांका दशमोडे, प्रियांका येवले, बेस कॅम्प टीमचे कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.