थेऊर, ता. २५ : लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालयाचा तीन महिन्यांपूर्वी श्री गणेशा झालेला असतानाही प्रशासनाला पूर्ण क्षमतेने कारभार करण्यासाठी गोरज मुर्हूत सापडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘अप्पर तहसील कार्यालय लोणीला, अन् हेलपाटे पुण्यात’ अशी पूर्व हवेलीतील नागरिकांची अवस्था झाली आहे.
लोणी काळभोर अप्पर तहसिलाचा बहुतांश कारभार पुण्यातील कार्यालयातूनच सुरू आहे. लोणी काळभोर येथील कार्यालयातून केवळ आवक जावक व अर्धन्यायिक न्यायाधिकरण सुनावणीच्या तारखा देण्याचे काम होते. कार्यालयांतील सर्व सेवांचा शुभारंभ कधी होणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. महसूलशी निगडित विविध प्रकरणांचे अर्ज लोणी काळभोर येथे दाखल करायचे व पुढील कामासाठी पुण्यातील खडकमाळ आळी येथील हवेली तहसील कार्यालयात हेलपाटे मारायचे, असा अप्पर तहसील प्रशासनाचा ‘तारीख पे तारीख’ कारभार सुरू आहे. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली. मात्र, तहसील कार्यालय प्रशासनातील कार्यविवरणामुळे लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालय नागरिकांसाठी सोयीचे ठरत नाही.
सातबारावरील हस्तलिखित चुका, ऑनलाइन ७/१२ मधील दुरुस्ती ही कामे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा १९६६ कलम १५५ अन्वये आरटीएस टेबल वरून होते. मात्र हा टेबलच पुण्यात असल्याने शेतकऱ्यांना सातबारावरील चुका दुरुस्तीसाठी पुण्यात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. गौणखनिजसह वतन, कुळकायदा या टेबलचा कारभारही पुण्यातील तहसील कार्यालयांतून होत असल्याने नागरिक हेलपाट्यांनी बेजार झाले आहेत.
लोणी काळभोर येथील अप्पर महसूल कार्यालयाच्या कारभाराची माहिती घेण्यात येईल. येथील कार्यालयीन व्यवस्था पूर्ण झाली असेल तर तेथूनच संपूर्ण कामकाज चालू करण्यात येईल. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने कामकाज अपेक्षित आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
- डॉ.यशवंत माने, उपविभागीय महसूल अधिकारी, हवेली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.