थेऊर, ता. २१ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिराजवळ सिमेंटचा माल पोहच करण्यासाठी आलेल्या चालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या ताब्यातील ५० लाख रुपये किमतीची अशोक लेलॅंड ट्रक पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बालाजी सिमेंट वेअरहाऊस जवळ मंगळवारी (ता. १९) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लिकार्जुन शांताच्या आवंती (वय ३३, रा. ९०/४३, मल्लिकार्जुन रस्ता, कोडला, ता. शेडम, जि. गुलबर्गा, कर्नाटक) व अशोक शिवाप्पा राठोड (वय ३९, रा. पद्मसागर कॉलनी, योगापूर रस्ता, जि. विजापूर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अनुजकुमार रामसुरत पांडे (वय २४, रा. माधवपूर आचार, पो. आगई, कुडवार, जि. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुज पांडे हे सुलतानपूर येथील रहिवासी आहेत. अनुजकुमार पांडे हे त्यांचा भाऊ अतुलकुमार पांडे यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्र. बीआर. २४ जीडी. २००८) चालक म्हणून काम करतात.
अनुजकुमार पांडे यांनी अतुलकुमार पांडे यांना मोबाईलवर फोन करून सांगितले की, श्री. सिमेंट कंपनी, कलबुर्गी (कर्नाटक) येथून सिमेंट भरायचे असून, बालाजी सिमेंट वेअरहाऊस, मनाली रिसॉर्टच्या समोर कदमवाकवस्ती येथे खाली करायचे आहे, असे भाडे मिळाले आहे.
त्यानुसार पांडे यांनी कलबुर्गी येथून सिमेंटचा १ हजार पोत्यांचा माल भरला, तो पोहोच करण्यासाठी पुण्याच्या दिशेने १० ऑगस्टला निघाले साधारण १०० किलोमीटर अंतर आल्यानंतर कळमनुर गावाजवळ गाडीचे क्लचप्लेट खराब झाले. अशोक लेलॅड कंपनीचे एएमएल मोटर्समध्ये गाडी दुरुस्ती करण्यासाठी लावण्यात आली. दोन दिवसानंतर गाडी दुरुस्त करून पांडे पुण्याच्या दिशेने निघाले व सिमेंटचा माल घेऊन कदमवाकवस्ती येथे मंगळवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास पोहचले. तेव्हा मल्लिकार्जुन आवंती व अशोक राठोड यांनी जबरदस्तीने पांडे यांच्या हातातून ट्रकची चावी घेत फिर्यादी यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने ट्रकमध्ये बसवून घेऊन चालले होते. राठोड हा ट्रक चालवीत होता. राठोड याने रस्त्याच्या एका बाजूला अचानक ट्रक थांबविला. या संधीचा फायदा घेऊन फिर्यादी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पोलिस ठाण्याला आले. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.