पुणे

पारंपरिक वाद्यांमध्ये लोणी काळभोरला मिरवणूक

CD

थेऊर, ता. ३ : पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ते पोलिस अंमलदार यांच्यापर्यंत सर्वांचा एकच ड्रेसकोड, गुलालाऐवजी फुलांची उधळण, ध्वनिवर्धकाऐवजी पारंपरिक वाद्ये, शालेय विद्यार्थ्यांनी जल्लोषात लेझीमवर धरलेला ठेका, पारंपरिक वेशातील महिलांची फुगडी अशा उत्साही वातावरणात निघालेली लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक यावर्षी नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
गणेश मंडळांसमोर आदर्श ठेवण्यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाची लोणी काळभोर पोलिसांसह पूर्व हवेलीतील नागरिकांनी आज उत्साही आणि शांततापूर्ण वातावरणात निरोप दिला. गणरायाचा निरोप घेताना लोणी काळभोर पोलिसांनी आदर्श विसर्जन मिरवणूक कशी असावी याचा वस्तुपाठ पुणे शहर पोलिसांसह राज्यातील गणेशोत्सव मंडळांसमोर घालून दिला. हवेली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली मिरवणूक पाहायला मिळाली, अशी चर्चा दिवसभर लोणी काळभोर परिसरातील नागरिकांमध्ये होती.
लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील गणरायाची आरती मंगळवारी (ता. २) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सरपंच राहुल काळभोर, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, कमलेश काळभोर, पोलिस पाटील लक्ष्मण काळभोर, प्रियंका भिसे, मिलिंद कुंजीर, महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता काळभोर, अॅड. राहुल झेंडे, गफूर शेख, राहुल क्षीरसागर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी विशाल वेदपाठक उपस्थित होते. लोणी काळभोर पोलिस ठाण्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. दत्तमंदिर, खोकलाई देवी चौक, गणपती मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, पाषाणकर बाग, साधना बॅंक, पोलिस ठाणे व बाजार मैदान या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. बाजार मैदान येथील कृत्रिम हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.
लोणी काळभोर गावातील कन्या शाळेतील मुलींनी लेझीम खेळत मिरवणुकीत सहभाग घेतला. या वेळी सुरताल ढोल-ताशा पथक आणि लोणी काळभोर येथील बाबा नाशिक बाजा ढोल-ताशा पथक यांनी वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात केली. या वेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळ, मृदंग आणि ढोलकी वाजवून आनंदोत्सव साजरा केला. पुणे शहर पोलिसांच्या बँड मास्टर पथकाने उपस्थितांची मने जिंकली. या मिरवणुकीत आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने गणपतीसमोर पारंपरिक पद्धतीने हरिपाठ म्हणत ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या चालीवर केलेल्या पदन्यासाने सर्वांचे लक्ष वेधले. श्रींचे दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी पूर्व हवेलीतील शेकडो गणेश भक्तांनी उपस्थिती दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandara Accident News : गणपती दर्शनासाठी आलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; कुटुंबाचा मन हेलावणारा टाहो

Latest Maharashtra News Updates : दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाड्यांना आग

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी! सामान्यांची रेटारेटी, तर व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड

Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून वेळेचे काटेकोर नियोजन

Pune News : भारतातील पहिली ‘एडीएएस टेस्ट सिटी’ पुण्यात; ‘एआरएआय’तर्फे उभारणी

SCROLL FOR NEXT