पुणे

लोणी काळभोरच्या पोलिस पाटलांना गंडा

CD

थेऊर, ता. १ : उसाच्या गुऱ्हाळासाठी ऊसतोड मजूर आणून देतो, असे सांगून दोन चुलत भावांनी लोणी काळभोर येथील पोलिस पाटलांची ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लोणी काळभोरचे पोलिस पाटील लक्ष्मण दशरथ काळभोर (वय ५९, रा. तरवडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कालूसिंग पावरा व भाईदास पावरा (दोघे रा. तेलखडे, ता. धडगाव, जि. नंदुरबार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण काळभोर यांचा कृष्णाई गूळ उद्योग समूह या नावाने गुऱ्हाळ व्यवसाय आहे. ऑक्टोबर २०२४ पासून कालु‌सिंग पावरा हा त्यांच्या गुऱ्हाळावर काम करीत होता .एप्रिल २०२५ मध्ये कालुसिंग याने सांगितले की, आमच्या गावाकडे ऊसतोड मजुर आहेत व माझा चुलत भाऊ भाईदास हा टोळीचा मुकादम आहे. त्याच्याकडे ४० ते ५० कामगार असून चर्चा करून आम्ही त्यांना घेऊन येतो.
कालुसिंग हा काम करीत असल्याने काळभोर यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर तो कामगार आणण्यासाठी नंदुरबारला गेला. गावाला गेल्यानंतर त्यानी काळभोर यांना फोन करून कामगार भेटले असून त्यांना २० हजार रुपये ॲडव्हान्स पाठवून द्या. त्यानंतर काळभोर यांनी फोन पेवरून प्रथम २० हजार व दुसऱ्यांदा २ हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर १० मे २०२५ रोजी कालुसिंग याचा काळभोर यांना पुन्हा फोन आला. त्यावेळी त्याने ४० ते ५० कामगार जमवले असून, त्यांना उचलेपोटी रक्कम द्यावी लागेल, त्यासाठी ५ लाख रुपये रोख घेऊन या, असे सांगितले. कामगार मिळतील, या अपेक्षेने काळभोर हे ५ लाख रुपये घेऊन नंदुरबार येथे गेले व त्यांनी कालुसिंग याच्यावर विश्वास ठेवून सदर रक्कम त्याच्याकडे दिली. दोन दिवसानंतर काळभोर यांनी कालुसिंगला फोन करून मजुरांच्या संदर्भात विचारणा केली असता त्याने लोकांची जुळवाजुळव झाली आहे. आम्ही दोन दिवसात सर्वजण येणार आहोत, असे सांगितले, परंतु ते आले नाहीत. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे लक्ष्मण काळभोर यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT