पुणे

कोरेगाव मूळ येथे घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज चोरी

CD

उरुळी कांचन, ता. १३ : घरात कोणीही नसल्याच्या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील इनामदारवस्ती परिसरात घडली .
याप्रकरणी सुनील लक्ष्मण कानकाटे (वय ५८, रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली; सध्या रा. आदित्य नगर, हडपसर) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कानकाटे हे हडपसर परिसरात राहत असून, त्यांच्या आई सुभद्रा लक्ष्मण कानकाटे या इनामदारवस्ती परिसरात राहतात. त्या आजारी असल्याने दोन दिवस रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना घरी आणले, यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडल्याचे दिसून आले. घरात जाऊन पाहणी केली असता घरातील ५० हजार रुपये रोख रक्कम, सोन्याची पोत, सोन्याची अंगठी, कर्णफुले, असे चार लाखांचे दागिन्यांची अशी एकूण साडेचार लाखांचा मुद्देमालाची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोड्या, दुचाकी व चारचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, पुणे- सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली. मात्र, त्या वाहनांचा व चालकांचा थांगपत्ताच अजून लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Schemes: बिहारमध्ये NDAच्या कल्याणकारी योजनांचा मास्टरस्ट्रोक? १,२ नाही तर 'इतक्या' योजना सुरू, ग्रामीण मतदारांची मतं वळवली!

Vastu Tips For God Hanuman Photo: हनुमानजींचा फोटो घरात कोणत्या दिशेला लावावा? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Latest Live Update News Marathi: निवडणुकीचा फॉर्म सतरा पानांचा; प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांची उडाली झोप

Kolhapur News: कोल्हापूरची लोकसंख्या वर्षभरात २६ हजारांनी वाढली; १६ वर्षांनंतरच्या जनगणनेची प्रतीक्षा अखेर संपली!

Dhayari News : धायरीत अंगणवाडी इमारत जीर्णावस्थेत, भिंतींना तडे, छताचे पत्रे गंजलेले; मुलांचे भविष्यच धोक्यात

SCROLL FOR NEXT