पुणे

पठारेवस्ती येथे तरुणाला मारहाण

CD

थेऊर, ता. २० : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण झाल्याची घटना पठारेवस्ती (ता. हवेली) येथील भगवाचौक येथे मंगळवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये मुलगा जखमी झाला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गौरव यशवंत रोकडे (वय २०, रा. वॉर्ड नं ४ पठारे वस्ती, कदमवाकस्ती, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य कांबळे (वय अंदाजे २२) व सुशांत दगडे (वय अंदाजे २३, दोघे रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव रोकडे हा आई प्रमिला रोकडे, वडील यशवंत रोकडे यांच्यासह राहण्यास असून, वडील मिळेल त्याठिकाणी पेंटिंगचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास गौरव घरी असताना त्याच्या मोबाईलवर नितीन नाईकवाडे याचा कॉल आला व त्याने सांगितले की, तुझ्या वडीलांना काही मुले भगवा चौक, पठारेवस्ती येथे मारहाण करीत आहेत. गौरव तत्काळ तेथे पोहोचला व आदित्य कांबळे, सुशांत दगडे यांना विचारले की, वडीलांना का मारहाण करत आहात? त्यावेळी त्यांनी गौरव यास शिवीगाळ करून धक्काबुक्की करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. गौरवचा मानलेला भाऊ दत्ता धायगुडे हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्याला देखील त्यांनी तू जर मध्ये आलास तर तुला देखील सुट्टी देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली आणि आदित्य कांबळे याने तेथे पडलेला दगड डोक्यात मारून गौरव याला जखमी केले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT