थेऊर, ता. २७ : थेऊर- कोलवडी रस्त्यावर ट्रकने नऊ दुचाकींना धडक दिल्याची घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळ बुधवारी (ता. २६) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम संतराम वरपे (वय २५, रा. कोरडेवाडी, जि. बीड) असे ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय मनोहर पवार (वय ३३, रा. थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे थेऊर येथील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. पवार यांनी थेऊर स्मशानभूमीच्या बाहेर थेऊर ते कोलवडी रस्त्याच्या कडेला दुचाकी लावली होती. तसेच, इतर नागरिकांनीही त्या ठिकाणी मोटार सायकली लावल्या होत्या. त्यावेळी ट्रकने दुचाकींना धडक दिली.
दरम्यान, या अपघातात विजय पवार, विकास व्यवहारे इतर ६ जणांच्या दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बारगजे करत आहेत.
00428
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.