थेऊर, ता. २८ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील कवडीमाळवाडीचा पाण्याचा वनवास संपणार आहे. नुकताच सहा लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याने दहा हजार लोकसंख्येला शाश्वत पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती नासीर पठाण यांनी दिली.
पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन माजी आदर्श सरपंच गणपत काळभोर यांच्या हस्ते पार पडले. कवडीमाळवाडी परिसरातील दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होते. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन सोहळ्याने पाणीपुरवठा समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना अधिकृतपणे सुरू झाली आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीला ८९ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. कवडीमाळवाडीतील १० हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू होण्यात अडथळे येत होते, अखेर ग्रामपंचायतीने स्वतंत्र जलसाठा उभारण्याचा निर्णय घेत प्रकल्पाची गती वाढवली. या अंतर्गत नायर कुटुंबाची चार गुंठे जागा ८४ लाख रुपयांमध्ये विकत घेतली. त्यासाठी ४२ लाख रुपये शासनाकडून तर उर्वरित ४२ लाख रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले. उद्योजक बाबूशेठ काळभोर यांनी पाच लाखांची मदत दिली. बाजारभाव वाढल्याने नवपरिवर्तन फाउंडेशनने अतिरिक्त चार लाख रुपये देऊन व्यवहार पूर्णत्वास नेला. भूमिपूजनाच्या दिवशी माजी सरपंच गणपत काळभोर यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. कार्यक्रमाला पोलिस उपनिरीक्षक उदय काळभोर, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच राजश्री काळभोर, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, सिमीता लोंढे, बीना काळभोर, अविनाश बडदे, सोनाली शिंदे, कोमल काळभोर, माजी सदस्य जयसिंग घाडगे, सूर्यनारायण काळभोर, मुकुंद काळभोर, चंद्रदीप काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, नितीन टिळेकर, सुनील घोरपडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अडथळे आले पण मागे फिरलो नाही,माजी आमदार स्व.बाबूराव पाचर्णे यांच्या पाठपुराव्यामुळे गावाला ८९ कोटी ९७ लाख रुपयाचा निधी मिळाला. योजना राबवताना अनेकांनी आडकाठी आणली, पण आम्ही चंग बांधला होता, काहीही झाले तरी ही योजना पूर्ण करायची. नागरिकांच्या घराघरांत नळातून पाणी येईपर्यंत संघर्ष थांबणार नाही.
- चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.