पुणे

महिलेवर अत्याचारप्रकरणी; कथित पत्रकारावर गुन्हा

CD

थेऊर, ता.२९ : हातउसने दिलेले पैसे काढून देतो असे सांगत कथित पत्रकाराने महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून लॉजवर नेत अत्याचार केल्याप्रकरणी कथित पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील वृदांवन लॉज येथे ता. ३ ते ४ मे २०२५च्या दरम्यान घडला.
हनुमंत राजकुमार सुरवसे (वय २९, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्या जुजबी ओळखीचे व्यक्ती हनुमंत सुरवसे यांनी एका हॉस्पिटलमध्ये शिबिर आयोजित केलेले होते. त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगत शिबिरामध्ये काढलेले फोटो पाठविण्यासाठी पीडितेचा मोबाइल क्रमांक घेतला व सर्व फोटो तिच्या व्हॉट्‌सॲपवर पाठविले. त्यानंतर सुरवसे हा पीडितेशी व्हॉट्‌सॲप कॉलवर बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोघांची चांगली ओळख झाल्याने तिने त्यास हात उसने दिलेल्या रकमेसंदर्भात सांगितले. यावर त्याने ता. ३ मे २०२५ला रात्रीच्या सुमारास उसने दिलेले पैसे काढून देतो असे सांगून फिर्यादीला त्याच्या वाहनामध्ये बसवले. तिला शीतपेयामधून काहीतरी गुंगीचे औषध देऊन थेऊर येथील वृदांवन लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच मोबाइलमध्ये विवस्त्र फोटो काढले ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे तीन लाखांची मागणी करत ३२ हजार रुपये घेतले. उर्वरित पैसे न दिल्यास फोटो व रेकॉर्डिंग व्हायरल करीन याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आमच्या बायका आणून मारत पोलिस ठाण्यात घेऊन जाईल अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT