पुणे

अष्टापुरात महिला जखमी

CD

उरुळी कांचन, ता. ९ : आष्टापूर जवळील खोलशेत वस्तीत मंगळवारी (ता. ९) पहाटे ५:१५ वाजता बिबट्याने अंजना वाल्मीक कोतवाल (वय ५५) यांच्यावर हल्ला करून जखमी केले.
अंजना कोतवाल या आष्टापूरातील खोलशेत वस्ती येथून खानापूर येथे दशक्रिया विधीला जाण्यासाठी, आपल्या राहत्या घरापासून सुरेश आनंदा कोतवाल यांच्या घराकडे निघाल्या होत्या. या दरम्यान रस्त्यामध्ये बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी आहेत. त्यांच्या डोक्यावर कपाळावर व पायावर बिबट्याच्या दातांनी जखमा केलेल्या आहेत. त्यांना वाघोली येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

वन विभागाने या परिसरातील नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी. बिबट्यास लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणी आष्टापुरच्या विद्यमान सरपंच पुष्पा सुरेश कोतवाल, उपसरपंच संजय भिकू कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्‍यामराव कोतवाल, श्रीहरी कोतवाल, कविता जगताप, नाथ कोतवाल, दत्तात्रेय कटके, राजेश कोतवाल समस्त ग्रामस्थ आष्टापूर यांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात तालुका वनाधिकारी सुरेश वरक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने दोन ते तीन पिंजरे लावण्याची व्यवस्था करीत आहोत.

00491

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT