पुणे

युवाशक्ती ही देशाला दिशा देणारी ऊर्जा

CD

थेऊर, ता. २३ : ‘‘युवाशक्ती ही देशाला दिशा देणारी नवी ऊर्जा असते. युवा शक्तीला विधायक दिशेकडे घेऊन गेल्यास संपूर्ण गावाचा नव्हे, तर देशाचा कायापालट होऊ शकतो. हा विश्वास सर्वच नेत्यांना होता म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात केली,’’ असे प्रतिपादन सोरतापवाडीच्या सरपंच सुनीता चौधरी यांनी केले.
समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर समारोप रविवारी (ता. २१) सोरतापवाडी (ता. हवेली) येथे संपन्न झाला. या शिबिराच्या समारोप प्रसंगी चौधरी बोलत होत्या. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, उपसरपंच विकास चौधरी, लोणीकाळभोर विद्या संकुलाचे कार्याध्यक्ष राहुल काळभोर, कारभारी चौधरी, सनी चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. संभाजी निकम यांनी सात दिवसातील कामाचा आढावा घेताना सांगितले की, तीन वर्षे सातत्याने समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर सोरतापवाडी येथे ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, सर्वेक्षण, विविध डिजिटल अॅपची ग्रामस्थांना माहिती देणे, खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो हा उद्देश ठेवून श्रम संस्कार शिबिराचे आयोजन केले होते. पुणे जिल्ह्यातील काटेवाडी आणि सोरतापवाडी ही दोनच गावे स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झाली आहेत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर म्हणाले की, ‘‘राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना महात्मा गांधीजींचे जन्मशताब्दी वर्ष २४ सप्टेंबर १९६९ या दिवशी झाली. याचा मुख्य उद्देश मी माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी असा आहे. आज संपूर्ण देशात ही योजना राबविली जाते.’’
यावेळी श्रमसंस्कार शिबिरात दररोज सायंकाळी व्याख्यानांचे आयोजन केले होते. भारतीय संविधान जागर, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, डिजिटल साक्षरता, हळदी- कुंकू समारंभ, मनातल्या कविता या विषयांवर प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा. डॉ. शेखर पाटील, प्रा. गणेश हजारे, प्रा. सुहास नाईक, प्रा. गणेश गाडेकर आदी तज्ज्ञांनी ग्रामस्थांना व शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा हिंगमिरे यांनी केले, तर आभार डॉ. शिवाजी गायकवाड यांनी मानले

विद्यार्थ्यांनी केली विविध कामे
विद्यार्थ्यांनी १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत ग्रामस्वच्छता आणि जलसंधारणावर गावात विविध विकासकामे केली. यामध्ये प्रामुख्याने गावातील रस्त्यांची व स्मशानभूमीची साफसफाई, कचरा कुंडीमुक्त गाव करण्यासाठी जनजागृती केली. सांडपाणी व्यवस्थापन, ठिकठिकाणी शोषखड्डे खोदून सांडपाण्याची विल्हेवाट लावली.

00538

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

High Court: बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पुरुषाच्या जननेंद्रियाचा स्त्रीच्या जननेंद्रियात प्रवेश करणे आवश्यक; उच्च न्यायालयाचा निर्णय

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

मोठी बातमी : T20 World Cup 2028 साठी १२ संघ निश्चित झाले! भारतात खेळण्यास नकार देणारा बांगलादेशही खेळणार, डायरेक्ट एन्ट्री

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT