पुणे

उरुळीतील देसाई महाविद्यालयात ‘ती लढली म्हणून आम्ही घडलो’

CD

उरुळी कांचन, ता. ३ : येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
‘ती लढली म्हणून आम्ही घडलो’ या विचारधारेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग व महिला समन्वय कक्ष यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. समीर आबनावे होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. नीलेश शितोळे, प्रा. शुभांगी धुमाळ, प्रा. सुजाता गायकवाड, ‘मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघ समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर, प्रा. वैशाली चौधरी, प्रा. डॉ. अमोल बोत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. आबनावे म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका तर होत्याच शिवाय त्या समाज सुधारक कवयित्री,भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या अशा अनेक भूमिका बजावत स्त्रियांना नवसंजीवनी देणाऱ्या त्या क्रांतिज्योती ठरल्या.’’ प्रा. डॉ. बोत्रे म्हणाले, ‘‘सावित्रीबाईंनी पुण्यातील साथीच्या रोगाच्या काळात हडपसर-सासवड या रस्त्यालगत उभारलेल्या रुग्णालयांमध्ये जाऊन पीडित लोकांची सेवा व त्यांना मदत केली.’’
सावित्रीच्या लेकींच्या वतीने कु. प्रियांका टिळेकर व कु. स्नेहा कदम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. सारिका ढोणगे यांनी केले. आभार पलक कानकाटे हिने मानले. सूत्रसंचालन हितेश राऊत याने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT