पुणे

नववीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

CD

थेऊर, ता. ५ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यश संतोष जाधव (वय अंदाजे १५), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सूर्या पार्क परिसरात सोमवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
यश हा हडपसर येथील साधना शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे आई, वडील व भाऊ हे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामावर निघून गेले होते. तो घरी एकटाच होता व नेहमीप्रमाणे तो सकाळी अकरा वाजता शाळेत जाणार होता. त्याचे वडील संतोष जाधव हे कामावरून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा यश हा घरात फॅनच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला व घटनास्थळी खुर्ची पडलेली आढळली. नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने मृतदेह ताब्यात घेतला. यश याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT