पुणे

अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड; आरोपीला अटक

CD

थेऊर, ता.७ : अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग व छेडछाड करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. वैभव संजय शिरवाळे (रा.कदमवाकवस्ती,ता.हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी पीडिताच्या आईने फिर्याद दिली आहे. एक दिवस शिरवाळे याने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून अल्पवयीन मुलीच्या अकाउंटवर मला तुझे बरोबर बोलायचे आहे असा मेसेज पाठवला. त्यावर मुलीने तू मला मेसेज करू नकोस. मी तुझ्या चुलत्याला सांगेल असा मेसेज पाठवला होता. पीडित मुलगी शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत चालली असताना शिरवाळे हा मंदिराजवळ थांबला होता. त्याने मुलीकडे एकटक पाहून तिचा पाठलाग केला. मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुद्धा आरोपीने तिच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला. ही बाब पीडिताने आईला सांगितल्यानंतर आई मुलीसह पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT