पुणे

सावकाराच्या जाचाला कंटाळून भवरापुरात शेतकऱ्याची आत्महत्या

CD

उरुळी कांचन, ता. २७ : खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून भवरापूर (ता. हवेली) येथील कैलास बबनराव साठे (वय ५२) या शेतकऱ्याने घराच्या पाठीमागे गळफास घेऊन आत्महत्या केली.
साठे हे अल्पभूधारक, कष्टकरी शेतकरी होते. शेतीतील अडचणी व कौटुंबिक गरजांमुळे त्यांनी एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या बदल्यात त्यांनी तब्बल एक एकर शेतजमीन त्या सावकाराच्या नावावर करून दिली होती. एवढे करूनही सावकाराचा लोभ शमला नाही. पैशांचा सतत तगादा, मानसिक छळ, धमकावणे आणि अपमानास्पद वागणूक सुरूच होती, असा आरोप साठे कुटुंबीयांनी केला आहे.
सततच्या दबावाखाली कैलास साठे पूर्णपणे खचले होते. अखेर रविवारी (ता. २५) सायंकाळी त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. काही वेळाने त्यांचा मुलगा व पत्नी यांना साठे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी तत्काळ उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, खासगी सावकाराच्या जाचामुळेच कैलास साठे यांनी आत्महत्या केली, असा थेट आरोप कुटुंबीयांनी केला असून, संबंधित सावकारावर कठोर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

00682

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT