पुणे

अजितदादा शेतकऱ्यांचे न्यायाधीश : सोपान कांचन

CD

उरुळी कांचन, ता. २८ : ‘‘अजित पवार म्हणजे शेतकऱ्यांचे न्यायाधीश होते. त्यांच्या समोर कोणताही प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्याचा बारकाईने अभ्यास करून तातडीने अधिकारी वर्गाला, ‘हे झालंच पाहिजे. हे करून घ्या,’ असे आदेश देऊन जनसामान्यांची सेवा करण्याला प्राधान्य देत. असाच एक प्रश्न मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. द्राक्ष बागायतदारांच्या बेदाणा उत्पादनाला ‘सुकामेवा’ वर्गात घेण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सविस्तर माहिती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांची बाजू वास्तव आहे, हे लक्षात आल्यावर तातडीने सूचना देऊन तसे होण्यापासून थांबवले. केवळ दादांमुळे ‘सुकामेवा’ वर्गात घेतलं गेलं नाही. हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा फायदाच होता’’ अशी आठवण राष्ट्रीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष सोपान कांचन यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, ‘‘अजितदादांनी अधिकाऱ्यांना याबाबत पटवून सांगितले की, याच्यावर शेतकरी कोणतीही प्रक्रिया करत नाही म्हणून त्याला प्रक्रिया उद्योगाचे कोणतेही नियम लागू करू नयेत. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर अजितदादा अभ्यास पूर्ण निर्णय घेण्यास सरकारला देखील भाग पाडत होते. विधानसभेत एखाद्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होण्यासाठी ते आपल्या जवळच्या आमदारांना अभ्यासपूर्ण भाषण करण्यासाठी प्रवृत्त करायचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून दिलासा देण्याचे काम करायचे. त्यांना एखाद्या विषयावर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर ते स्वतः फोन करून आमच्यासारख्या शेती व शेतकरी यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेऊन अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावायचे. असा नेता जाण्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. या नेत्याची आजही आणि भविष्यातही नितांत गरज होती.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT