उरुळी कांचन, ता. १४ : देशातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कन्याकुमारीहून निघालेल्या किसान जागृती यात्रेचे सोमवारी (ता.१६) रांजणगाव गणपती (ता. हवेली) येथे आगमन होणार आहे.
देशातील शेतकऱ्यांसाठी एमएसपीला कायदेशीर हमी, संपूर्ण कर्जमाफी, उसाचा एफआरपी दर ६०० रुपये करणे, जमीन संपादन कायदा २०१३ पुन्हा लागू करणे, पीक विमा योजनेत सुधारणा अशा मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व शेतकरी नेते जगजीतसिंग डल्लेवाल (पंजाब) यांच्या नेतृत्वाखाली सात फेब्रुवारी २०२६ पासून १९ मार्च २०२६ पर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर अशी किसान जागृती यात्रा सुरू आहे. ही यात्रा विविध राज्यांमधून प्रवास करत सोमवारी जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी विविध प्रादेशिक शेतकरी संघटना, ग्राहक संघटना, भ्रष्टाचारविरोधी संघटना, माहिती अधिकार संघटना तसेच अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
शेतकरी नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांनी यापूर्वी शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सलग १३ महिने चाललेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तसेच सन २०१८ मध्ये रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्यानंतरही त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे मागण्या मान्य करून घेण्यासाठी सलग १३१ दिवस उपोषण केले होते.
यात्रेच्या स्वागतासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटना, ग्राहक संघटना, स्वराज जनजागृती परिषद, ग्रामस्वराज प्रतिष्ठान, रांजणगाव गणपती ग्रामपंचायत, वारकरी सांप्रदाय रांजणगाव गणपती यांनी केले आहे
‘शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी सहभाग नोंदवा’
यात्रेला सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवावी, ही नम्र विनंती. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी हा लढा असून प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे, असे आवाहन माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.