पुणे

खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना

CD

थेऊर, ता. १८ : बनावट आधार कार्ड, खोटे हमीपत्र आणि गुन्हे लपवून थेट पिस्तुलाचा परवाना एका गुन्हेगाराने मिळवल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर पोलिसांनी परवान्यासाठी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केल्यानंतर समोर आला आहे. या प्रकारामुळे गुन्हेगाराने पोलिस यंत्रणेलाही हादरवून सोडले आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्यात रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार तेज भोसले यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रोहितने आपण लोणी काळभोर येथील तरवडी रानमळा परिसरात वास्तव्यास असल्याचे खोटे कागदपत्र तयार केले होते आणि या कागदपत्रांच्या साह्याने पुणे पोलिस आयुक्तालय येथे नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता. आधारकार्ड व हमीपत्राच्या आधारे त्याने पिस्तूल परवाना मिळवला आहे; मात्र नंतर झालेल्या चौकशीत हा सारा प्रकार फसवणुकीचा असल्याचे निष्पन्न झाले. परवान्यासाठी दिलेल्या पत्त्यावर लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता,संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी कधीही राहत नसल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच जाणीवपूर्वक खोटा पत्ता वापरून पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, रोहित भामे हा आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हवेली पोलिस ठाण्यात घरफोडी, नुकसान, अडवणूक आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

२०२४मध्ये गंभीर गुन्हा दाखल
आर्म्स ॲक्ट अंतर्गतही रोहितवर २०२४ मध्ये गंभीर गुन्हा दाखल आहे. तरीसुद्धा आरोपीने “माझ्यावर कोणतेही गुन्हे नाहीत” असे खोटे हमीपत्र देत शस्त्र परवाना क्रमांक ०३२ व पिस्तूल मिळवली. आरोपी रोहितने लोणी काळभोर गावात “केदारनाथ ब्रिक्स” नावाने व्यवसाय असल्याची खोटी माहिती दिली होती. एकूणच बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवत शासनाची फसवणूक केली, अशी फिर्याद पोलिस हवालदार तेज भोसले यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Navi Mumbai: क्षुल्लक कारण पण अमानुष शिक्षा! हातावर व्रण येईपर्यंत ४० फटके अन्...; टीचरचं विद्यार्थिनीसोबत विकृत कृत्य, काय घडलं?

Holi Horoscope Predictions: होळीनंतर मेषसह 'या' दोन राशींच्या आयुष्यात घडणार मोठे बदल; गुरु मार्गी होताच सुख-समृद्धीचे नवे योग

Latest Marathi News Live Update : "कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, डेटा गोळा करण्याचं काम सुरु"- चंद्रकांत पाटील

फक्त 6 दिवसांत बदलणार मिथुनसहित तीन राशींचं नशीब; गजकेसरी योगामुळे होणार पैशांची बरसात

SCROLL FOR NEXT