पुणे

लोणी काळभोरच्या व्यापाऱ्याकडून अका आडत्याला ३५ लाखांचा गंडा

CD

थेऊर, ता. २१ : कृषिमालाच्या व्यवहारातून विश्वास संपादन करून तब्बल ३४ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात घडली आहे.
याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात माणिक विलास मापारे (रा. टाकळी भीमा, ता. शिरूर) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नानासाहेब सुखदेव कौंडुभैरी (वय ५०, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानासाहेब कौंडुभैरी हे मार्केटयार्ड येथे आडत भुसार व्यापारी असून, शेतकऱ्यांकडून कृषिमाल खरेदी करून तो विविध शहरांतील व्यापाऱ्यांना पुरविण्याचा व्यवसाय करतात. मार्केटयार्ड परिसरातील प्रकाश लोढा यांच्या ओळखीने माणिक विलास मापारे या व्यापाऱ्याशी त्यांचा संपर्क झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये मापारे यांनी तातडीने चार ट्रक (सुमारे १२० टन) मक्याची मागणी कोंडूभैरी यांच्याकडे केली. त्यानुसार माल लोणी काळभोर येथील गुरुदत्त वजनकाट्यावर पाठविण्यात आला. या पहिल्या व्यवहाराचे सुमारे २२ लाख ५० हजार रुपये मापारे यांनी आरटीजीएसद्वारे दिल्याने कोंडूभैरींचा विश्वास बसला. यानंतर आणखी मक्याची मागणी मापारे याच्याकडून करण्यात आली. विश्वास संपादन झाल्यामुळे कौंडुभैरी यांनी वेगवेगळ्या तारखांना पाच ट्रक मका लोणी काळभोर येथे माणिक मापारे यांच्याकडे पाठविला. या मालाचे एकूण मूल्य ३४ लाख ६० हजार ९१७ रुपये झाले होते. मात्र, हा माल ताब्यात घेतल्यानंतरही त्याचे पैसे देण्यास माणिक मापारे यांनी टाळाटाळ करीत होते.
मापारे यांनी यापोठी २५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, तो बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाला. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने वेळोवेळी पैसे देण्याचे आश्वासन देत संदेश पाठविले, परंतु प्रत्यक्षात पैसे दिले नाहीत. याप्रकरणी नानासाहेब कौंडुभैरी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणिक मापारे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT