पुणे

वळतीत जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

CD

उरुळी कांचन, ता. १४ : जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याप्रकरणी वळती (ता. हवेली) येथील आठ जणांवर उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली फिर्याद अरविंद मच्छिंद्र कुंजीर (वय ५०, रा. वळती, ता. हवेली) यांनी दिली. रविवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास ते शेतात पाणी देत असताना बांधावरील झाडांच्या वादातून संभाजी एकनाथ कुंजीर (वय ४२), शैला संभाजी कुंजीर (वय ३६, दोघे रा. वळती, ता. हवेली), दिनेश शांताराम म्हस्के (वय ३४) व उमेश शांताराम म्हस्के (वय ३५, दोघे रा. डाळींब, ता. दौंड) यांनी त्यांच्यावर कोयता, गज व विळ्याने हल्ला करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यात कुंजीर गंभीर जखमी झाले आहेत.
दुसऱ्या घटनेत, एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अरविंद कुंजीर, वैशाली कुंजीर, सृष्टी कुंजीर आणि (सर्व रा. वरचा मळा, वळती) व अजित भिसे (रा. कासुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली व विनयभंग होईल असे वर्तन केले, तसेच तक्रार दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उरुळी कांचन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT