उरुळी कांचन, ता. २५ : मुळा-मुठा व इंद्रायणी नदीत सोडलेल्या रसायनयुक्त व मैलामिश्रित पाण्यामुळे वाढणाऱ्या जलपर्णी व डासांमुळे दौंडसह हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ, बिवरी, हिंगणगाव, आष्टापूर, भवरापूर, पिंपरी सांडस आदी गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीतील प्रदूषणामुळे निर्माण होणारे डास पशुधनांच्या मुळावर उठले आहेत. दूषित पाण्यामुळे पिकांवर परिणाम होऊ लागल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
रसायनमिश्रित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र दिनापासून नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीवर बसून उपोषण करण्याचा इशारा मुळा-मुळा नदीकाठच्या ग्रामस्थांसह हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल यांनी प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेबोल्हाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार नदीकाठच्या गावांचा सर्वे केला आहे. आमदार बापूसाहेब पठारे व ज्ञानेश्वर कटके यांनी देखील हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. परंतु नद्यांमध्ये सोडण्यात येणारे पाणी दूषित व मैला मिश्रित स्वरूपातच येत असल्यामुळे तेथे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होण्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांचे व पशुधन आणि आरोग्य धोकादायक आले आहे. या बाबीचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलावीत. अशा आशयाच्या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त पुणे महानगरपालिका, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पुणे, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलिस यांना देण्यात आलेल्या आहेत, असे कोतवाल यांनी सांगितले.
01076
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.