थेऊर, ता. २६ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अवैध मटका, जुगार धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईतून २ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना मिळालेल्या माहितीवरून, पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी थेऊर फाटा येथील नयन बारजवळ अवैधरीत्या सुरू असलेल्या सोरट, पंतीपाकुळी व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
यामध्ये पोलिसांनी जुगार घेणारे सुजित बोडके (वय ३६, रा. थेऊर, ता. हवेली), २) करण काळे (वय २९, रा. कवडी टोलनाका, कदमवाकवस्ती) आणि जुगार खेळणारे विशाल वाघमारे (वय ३०, रा. माळीमळा, लोणी काळभोर), सतीश चौंडकर (वय ४४, रा. वरचावाडा, कुंजीरवाडी), बंटी गायकवाड (वय २७, रा. तरवडी रायवाडी, लोणी काळभोर), मंदार हगवणे (वय ४०, रा. खोरवडावस्ती, सोरतापवाडी), शिवाजी चव्हाण (वय ६३, रा. चव्हाण वस्ती, थेऊर) यांना अटक केली. तर, कारवाईत २ लाख ६७ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये ७८३० रुपये रोख रक्कम, ६० हजार रुपये किमतीचे ६ मोबाइल हँडसेट, २ लाख रुपये किमतीच्या चार मोटरसायकल व जुगार साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे, हवालदार संदीप जोगदंड आदींनी केली. या जुगार धंद्याचा मालक विकास राजाभाऊ कांबळे (वय ३२, रा. काळेवाडी, ता. हवेली) व इतर दोन अनोळखींचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.