उरुळी कांचन, ता. ६ : थेऊर फाटा (ता. हवेली) येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रात्री घरी परतत असताना पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवन हनुमंत सुरवसे (वय ३३, रा. दहावा मैल, वडकी,ता. हवेली) याचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. ४) मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पवन हे पुणे शहरात ‘झोमॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होते. याप्रकरणी त्यांचे साडू ज्ञानेश्वर शंकर रणदिवे (वय ३४,रा. कुंजीर गॅरेज, थेऊर फाटा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रणदिवे आणि पवन सुरवसे हे ३१ ऑगस्ट रोजी रक्षाबंधननिमित्त कात्रज येथे नातेवाइकांकडे गेले होते. तेथून १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते रिक्षाने हडपसर येथे आले. मात्र, रात्री वडकीकडे जाण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांनी थेऊर फाट्यावरील कुंजीर गॅरेज येथे रात्र घालवण्याचे ठरवले.
रात्री अडीचच्या सुमारास दोघे एका पिकअप वाहनातून थेऊर फाट्यापुढे कुंजीर गॅरेजसमोर उतरले. गॅरेजकडे जाण्यासाठी ते पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने पवन यांना धडक दिली. या अपघातात पवन यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान चार दिवस उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक शेळके पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.